Header Ads

विजापूरकरांचा अभेद्य किल्ला - विजयदुर्ग | Marathi Express

 विजापूरकरांचा अभेद्य किल्ला - विजयदुर्ग | Marathi Express

इतिहास :

विजयदुर्ग हा किल्ला ११ व्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला. पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता. टॅव्हेरनिअर याने इ.स. १६५० मध्ये या किल्ल्याला भेट दिली होती. तेव्हा त्याने त्याचे वर्णन 'विजापूरकरांचा अभेद्य किल्ला' असे करून ठेवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६४च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला.

कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इ.स. १७५६पर्यंत होता. पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने १३ फेब्रुवारी १७५६ रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला. यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले. इंग्रज-पेशवे करारानुसार विजयदुर्ग पेशव्यांना देण्याचे ठरले होते परंतु इंग्रज सहजासहजी त्याला तयार झाले नाहीत. अखेर बाणकोट किल्ला व त्या जवळील सात गावे पेशव्यांकडून घेऊन इंग्रजांनी विजयदुर्ग आठ महिन्यानंतर पेशव्यांना दिला. पेशव्यांनी विजयदुर्गाचा प्रांत व सुभेदारी आनंदराव धुळप यांना दिली. १६६४ ते १८१८ पर्यंत या किल्ल्यावर मराठी अंमल होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला.

विजयदुर्गला पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत कारण हा एक अजिंक्य किल्ला होता. ४० किलोमीटर लांब असलेली वाघोटन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे. कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात, पण ती समुद्रावरून दिसत नसत.

हवामान :

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

नागरी सुविधा :

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

विजयदुर्गला पोहचायचे कसे:

विजयदुर्ग हे मुंबई पासून ४८५ किमी अंतरावर आहे तर पुण्यापासून ४५५ किमी अंतरावर आहे

 

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून दिनांक १३ डिसेंबर, इ.स. १९१६ या दिवशी घोषित करण्यात आलेले आहे

विजयदुर्गाचे रहस्य :

एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी तीन युद्धनौका आणि सैन्य घेऊन स्वारी केली. जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडिमार करून मग किल्ल्यावर चढाई करायची. त्याअनुषंगाने सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायाचा त्यांचा मनसुबा होता पण, एकेक करून तीनही युद्धनौका बुडाल्या. याच कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असणारी जाडजूड भिंत ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली किल्ल्याचं शत्रूंकडून संरक्षण करण्यासाठी. हि भिंत इतकी खोल आहे की ती ओहोटीतही पाण्याच्या वर दिसत नाही. स्वराज्याच्या आरमाराची जहाजं गलबतं-मचवे वगैरे ह्या भिंती वरून सहज ये-जा करत. कारण त्यांचे तळ, उथळ आणि सपाट होते. याविरुद्ध इंग्रजांच्या जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत. म्हणूनच पाश्चात्यांची जहाजं गडाजवळ येऊन या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जातं. या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळं विजयदुर्ग अभेद्य राहीला. सदर भिंत हि शिवरायांच्या कारकिर्दीत बांधल्याच्या तथ्याला नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्रफीतील तज्ञांनी दुजोरा दिला

विजयदुर्गाचा प्राचीन इतिहास सुस्पष्ट नाही. तो शिलाहारांनी बांधला असावा, असे एक मत आहे. पंधराव्या शतकात विजापूरच्या आदिलशाहने तेथे काही प्रमाणात बांधकाम केले; पण किल्ल्यावर मुसलमानी वास्तकलेचे फारसे अवशेष दिसत नाहीत. सतराव्या शतरात चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून छ. शिवाजी महाराजांनी कोकणातील मुलूख काबीज केला. तेव्हा त्यांनी विजयदुर्ग घेऊन (१६५४) त्यात पदरी तट, भव्य बुरूज व अनेक वास्तू बांधल्या.

सिद्दी तसेच इंग्रज−पोर्तुगीज यांवर वचक ठेवण्साठी महाराजांनी हे आरमारी ठाणे निवडले. त्यांच्या मृत्यूनंतर छ. राजाराम ह्यांच्या वेळी कान्होजी आंग्र्यांनी विजयदुर्ग येथे आपले प्रमुख ठाणे उभारून ‘सरखेल’ हा किताब मिळविला आणि १६९८ ते १७२९ पर्यंत पश्चिम किनाऱ्यावर आपले वर्चस्व राखले. छ. शाहू महाराजांनी त्यांची सेवा लक्षात घेऊन पुढे त्यांच्या मुलाकडे सरखेलपद दिले. आंग्र्यांनी येथे गोदी बांधून जहाज बांधण्याचे कारखानेही सुरू केले. कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांत तंटे सुरू झाले. मुलगा तुळाजी आंग्रे पेशव्यांना जुमानीसा झाला. तेव्हा त्याचा उच्छेद करावा हा हेतू मनात धरून पेशवे व इंग्रज एक झाले. तुळाजीने १७५४ मध्ये त्यांची अनेक जहाजे पकडली, काही जाळली.

तुळाजीने आपल्या आरमारात अनेक नवीन जहाजे बांधविली व त्यांवर पगारी यूरोपीय कामगार नेमले. यामुळे पश्चिम किनाऱ्यावर तो जणू अनभिशिक्त राजात समजला जाऊ लागला. आंग्रे यांच्याशी मराठ्यांचे संबंध बाळाजी बाजीरावाच्या कारकीर्दीत बिनसले. हे तंटे कमी करण्याऐवजी पेशव्याने ते वाढविले, असा शाहूंचा स्पष्ट आरोप होता. पेशव्यांचे इंग्रज आणि पोर्तुगीज या पाश्चिमात्य सत्तांशी मैत्रीचे संबंध होते. त्याचा फायदा घेऊन आंग्रे बंधूचा मिळेल तितका प्रदेश जिंकण्याचा सपाटा पेशव्यांनी लावला. तुळजीची भीती प्रामुख्याने पाश्चिमात्यांना होती; तथापि नानासाहेबाने स्वार्थी हेतूने आँग्र्यांच्या आरमाराचा नाश केला आणि पुढे पश्चिम किनाऱ्यावर त्यामुळे इंग्रज बलवत्तर झाले.

तुळाजी आंग्रे विरूद्घच्या युद्धात कोणत्याही आंग्रे बंधूंनी युतीच्या बाजूने भाग घेतला नाही. परिणांतः विजयदुर्गाबरोबरच मानाजी आँग्र्यांच्या आरमाराचा नाश केला आणि पुढे पश्चिम किनाऱ्यावर त्यामुळे इंग्रज बलवत्तर झाले. तुळाजी आंग्रे विरुद्धच्या युद्धात कोणत्याही आंग्रे बंधूंनी युतीच्या बाजूने भाग घेतला नाही. परिणामतः विजयदुर्गाबरोबरच मानाजी आँग्रेचा पनवेलजवळचा बिकटगड आणि इतर प्रदेशही बाळाजी बाजीरावाने जिंकून घेतले. तुळाजीने घाबरून नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून उभय पक्षांचा घरोबा पूर्वीपासून चालत आहे, त्याची अभिवृद्धी व्हावी असे कळविले; तथापि पेशव्याने २६ मार्च १७५५ रोजी तुळाजीविरोधी संयुक्त मोहिमेस प्रारंभ केला.

अखेर तुळाजीचा पराभव होऊन विजयदुर्ग इंग्रजांच्या हाती पडला (१३ फेब्रुवारी १७५६). इंग्रजांनी किल्लावरील अमाप संपत्ती लुटली. तुळाजी पुढे पेशव्याच्या कैदेतच १७८६ मध्ये मरण पावला. वाणकोटच्या बदल्यात इंग्रजांनी विजयदुर्ग पेशव्यास दिला. आंग्र्यांच्या अस्तानंतर विजयदुर्गचा प्रांत व आरमाराची सुभेदारी पेशव्यांनी आनंदराव धुळप यास दिली. मराठ्यांचे आरमार कमकुवत होण्यास येथूनच प्रांरंभ झाला. पुढे माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पोर्तुगीजांचे कोकणपट्टीवरील विजयदुर्ग, रत्नागिरी वगैरे स्थळे घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा १७७३ च्या जानेवारीत त्र्यंबक विनायक व कृष्णाजी धुळप यांनी पोर्तुगीजांना विजयदुर्गातून हुसकावून लावले. पेशवाईच्या अस्तापर्यंत (१८१८) विजयदुर्ग मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर इंग्रजांनी तो जिंकून घेतला.

सुमारे आठ हेक्टर (५ चौ. किंमी.) क्षेत्रफळाच्या या किल्ल्याला त्रिपदरी तट, सत्तावीस बुरूज व तीन प्रवेशद्वारे आहेत. मुख्य द्वाराच्या आतील बाजूस जुन्या कोठाराची इमारत असून तिची डागडुजी करून विश्रानधामात रूपांतर करण्यात आले आहे. त्याच्यासमोर पोलिसांकरिता निवासस्थाने बांधलेली आहेत. विश्रामधामाजवळच जीर्ण अवस्थेत एक जुना तलाव असून त्याजवळ मत्स्योत्पादन केंद्र/मासे खारविण्याचे केंद्र आहे. या वास्तूसमोरच लॉकियर या पाश्चात्त्य ज्योतिर्विदाने १८९८ मध्ये ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी बांधलेले सिमेंटचे कट्टे आहेत. विजयदुर्गच्या खाडी किनाऱ्याला लागूनच ३ किमी. वर आंग्र्यांनी उभारलेली ११० मी. लांब व ७० मी. रूंद अशी उत्तराभिमुख गोदी आहे.

विजयदुर्गच्या किल्ल्यात चार लहान मंदिरे आहेत. यांशिवाय परिसरात नाना फडणीसांचे बंधू गंगाधर भानू यांनी बांधलेले रामेश्वर मंदिरे असून समामंडपाबाहेर दीपमाळ आहेत. गाभाऱ्यात शिवपिंड आणि बंदिस्त खोलीत पन्नास किलो वजनाची चांदीची वृषबारूढ चतुर्भुज शिवमूर्ती आहे. मंदिराच्या उजव्या बाजूस आवाराबाहेर आंग्र्यांची एक छत्री व सतीची शिळा आहे.

किल्ल्याजवळ एक दीपगृह आहे. परिसरत दोन माध्यमिक शाळा आहेत. येथे गव्हाच्या शिंगाच्या वस्तू बनविण्याचा छोटा उद्योग तसेच वाघोटन नदीत मच्छेमारीचा व्यवसाय चालतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.