Header Ads

प्रतापगड - अफजलखानाचे शिर या बुरूजात पुरले Marathi Express

 प्रतापगड - अफजलखानाचे शिर या बुरूजात पुरले Marathi Express
प्रतापगड  भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

प्रतापगडाचा इतिहास :

अफजलखानाने दगा केल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला मारले. त्यानंतर संभाजी कावजी या मर्दानी गड्याने अफजलखानाचे शिर या बुरुजात पुरले, असे इतिहास सांगतो. भवानीच्या नगरखान्याची खिडकी उघडून पाहिल्यानंतर देवीचा चेहरा दिसतो. या देवीचीही एक कथा सांगितले जाते. शिवाजी महाराजांनी या देवीसाठी रोज सनई चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली होती. हडप आडनावाचा पुजारी तिला पंचामृतासह नैवेद्य दाखवीत असे. या भवानीमंदिरात सभामंडप व नगारखाना आहे. मंदिरापासून शे-दोनशे पावले चढल्यावर एक छोटेखानी दरवाजा लागतो आणि तेथूनचलेकिल्ल्यात बा प्रवेश होतो. त्याच्यापुढे एक पडीक चौथरा आहे. विमानातून प्रतापगड पाहिला तर त्याचा आकार फुलपाखरासारखा दिसतो. १४०० फूट लांबी आणि ४०० फूट रुंदी एवढा त्याचा विस्तार आहे. इतर गडापेक्षा या गडाला विशेष चांगली तटबंदी आहे. वायव्येकडील कडे ८०० फुटांहून अधिक उंच आहेत. बालेकिल्ल्याच्या ईशान्येला किल्यातल्या दोन तळी आहेत. तेथून कोयनेचे खोरे सुंदर दिसते. आणि येथेच ही किल्ल्याची फेरी पूर्ण होते. इतिहास-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडाचे बांधकाम इ.स.१६५६ पार पडलेे.छत्रपती राजाराम महाराज गडावर एप्रिल १६८९ ते १० ऑगस्ट १६८९ पर्यंत वास्तव्यास होते, छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखान सोबत पहिली लढाई याच गडाच्या पायथ्याशी झाली, नेत्रदीपक कामगिरी बजावली होती या लढाईत पायदळ प्रमुख पिलाजी गोळे हे छत्रपती सोबत चिलखती प्रमाणे पुढे होते 

इ.स.१६५६ ते इ.स १८१८ काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रु पासुन अभेद्य राहिला. 

१७ फुटाचा ब्रॉन्झ चा शिवाजी महाराजाचा पुतळ्याचे उदघाटन इ.स १९५७ पंडित. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले. 

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

वाहनतळावरून गडाच्या दक्षिणेच्या टेहळणी बुरुजाखालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाज्यात येऊन पोहोचतो. वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो. महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरूज दिसतो. हा बुरूज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते. मंदिरात भवानीमातेची सालंकृत प्रसन्न मूर्ती आहे. ही मूर्ती महराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतली. या मूर्तीशेजारीच छत्रपती शिवाजी महाराज च्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे. 

ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे. या मंदिराशेजारीच प्रशस्त सदर आहे.किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूला पहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात.आणि या प्रत्येक पर्वतांचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. 

केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईच्या वाड्याचे अवशेष आहेत. येथे उजवीकडे बगीचाच्या मधोमध शिवाजीचा महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता. या पुतळ्याशेजारीच शासकीय विश्रामधाम असून येथील बागेतून उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोर्‍याचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याला महादरवाज्याखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राजपहार्‍याचा दिंडी दरवाजा आहे. त्याच्या जवळ रेडका बुरूज, पुढे यशवंत बुरूज, तर त्याच्यापुढे सूर्य बुरूज हे बुरूज आहेत.. 



कसे जावे?

प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण - महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.

उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्‍या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. 

अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे. थोड्या पायऱ्या चढून गेल्यावर दरवाज्यात उभे राहता येते. दरवाज्याच्या आतल्या बाजूला द्वाररक्षकांची ठिकाणे दिसतात. हाबुरूज सोमसूत्री प्रदक्षिणा करून पाहता येतो.या ठिकाणी इतिहास अभ्यासक, शाळेच्या व महाविद्यालयाच्या सहली जातात. हे एक पर्यटकाचे आवडते ठिकाण आहे. दर वर्षी या ठिकाणी शिवप्रताप दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रतापगड परिसर पाहत असताना आपणास इतिहासातील अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात .शूरता आणि गनिमीकावा व इतिहासातील शिवप्रतापाच्या अनेक गोष्टींची साक्ष आजही प्रतापगडावर गेल्यावर आपणास होते.जवळी खोरे कसे होते व आहे याचा उलगडा येथे गेल्यावरच होतो.

एकदा तरी भेट द्याच...आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.