Header Ads

वृद्ध पेन्शन योजना महाराष्ट्र काय आहे लाभ पहा Vrudh Pension Yojana Maharashtra

वृद्ध पेन्शन योजना महाराष्ट्र काय आहे लाभ पहा Vrudh Pension Yojana Maharashtra


नमस्कार मित्रांनो ,आज आपण वृद्ध पेन्शन योजना महाराष्ट्र (vrudh pension yojana maharashtra) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. चला तर मग मित्रांनो पाहुयात ,काय आहे कौशल्य विकास योजना आणि त्यासाठी काय लागणार आहे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतील, सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेचा लाभ कसा घेता येईल इत्यादी सर्व माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

वृद्ध काळामध्ये अनेक नागरिकांना निराधार अवस्था येण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून राज्य शासन व केंद्र शासन उपाय करण्याचे प्रयत्न करत असते. त्या मदनाचा प्रति महिना अर्थसहाय्य करण्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत. त्यामधील काही योजना पूर्णपणे महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत आहेत तर काही केंद्र व राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू आहेत. वृद्ध नागरिक हे येणाऱ्या पिढ्यांसाठी व मुख्यतः तरुण पिढीला मार्गदर्शन करू शकतात व ते समाजातील एक महत्त्वाचा घटक आहेत. त्यामुळे त्यांच्या वृद्ध काळामध्ये जर ते निराधार असतील तर त्यांना मदत करणे हे शासनाचे तसेच आपल्या सर्वांचे नैतिक कार्य आहे. त्यामुळे आम्ही देखील या लेखांमध्ये वृद्ध नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या योजनांची सविस्तर माहिती देण्याचे काम करत आहोत.

vrudh pension yojana maharashtra महाराष्ट्रातील ही अशी योजना आहे की जी राज्य शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश हा आहे की राज्यातील वृद्ध नागरिकांना प्रति महिना अर्थसहाय्य करणे. या योजनेला इंदिरा गांधी नॅशनल वृद्ध पेन्शन योजना असे देखील म्हटले जाते. मुख्यतः केंद्र शासनाद्वारे ही योजना पुरस्कृत केली गेली आहे. राज्यातील सर्व प्रवर्गातील वृद्ध नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकतात. प्रति महिने सहाशे रुपये या योजनेद्वारे मिळतात. या योजनेला अर्ज करण्याची प्रक्रिया ऑफलाईन कार्यालयीन आहे.

vrudh pension yojana maharashtra पात्रता

  • वय 65 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक.
  • दारिद्र रेषे खालील कुटुंब

फायदे :- 

vrudh pension yojana maharashtra योजना केंद्र शासन व राज्य शासन या दोन्हींच्या मदतीने होत असल्याने मिळणारी पेन्शन ही विभागली गेली आहे. प्रति महिना जे 600 रुपये मिळणार आहेत त्यातील 200 रुपये हे केंद्र शासनाकडून येतात आणि 400 रुपये हे महाराष्ट्र शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेद्वारे येतात. अशाप्रकारे वृद्ध नागरिकांना एक रकमे 600 रुपये प्रति महिना या योजनेच्या माध्यमातून मिळतात.

vrudh pension yojana maharashtra अर्ज कसा करावा

vrudh pension yojana maharashtra योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन कार्यालयीन अशा प्रकारचे आहे. त्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर ऑफिस किंवा तहसीलदार ऑफिस किंवा तलाठी ऑफिस या ठिकाणी भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहिती मिळेल. तसेच या योजनेसाठी अर्ज देखील तुम्हाला त्या ठिकाणाहूनच करता येईल. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या कार्यालयांना भेट देणे गरजेचे आहे. अधिक माहिती तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन मिळवू शकता.

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना :-

वृद्धांसाठी सुरू केलेली ही देखील एक पेन्शन योजना आहे की ज्यामध्ये वृद्ध नागरिकांना प्रति महिने अर्थसहाय्य केले जाते. ही योजना संपूर्णपणे राज्य शासन पुरस्कृत आहे. यामध्ये राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा निवृत्ती वेतन दिले जाते. या योजनेमध्ये देखील वयाची अट 65 वर्षापेक्षा जास्त आहे. तसेच लाभार्थी कुटुंब दारिद्र रेषेखाली असावे. येथे देखील प्रति महिने सहाशे रुपये प्रति लाभार्थी दिले जातात. योजनेच्या गट अ मधील लाभार्थी नागरिकांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून लाभ दिले जातात. व गट ब मधील लाभार्थी नागरिकांना संपूर्णपणे राज्य शासनाच्या वतीने लाभ दिले जातात. या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत देखील ऑफलाईन आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालयामध्ये भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता.


मित्रांनो , ह्या लेख मध्ये आम्ही वृद्ध पेन्शन योजना महाराष्ट्र (vrudh pension yojana maharashtra) या योजनेबद्दल माहिती दिली आहे जसे कि उद्दिष्ट, ती योजना म्हणजे काय इत्यादी. या योजनेमध्ये राज्यातील विरुद्ध नागरिकांना आर्थिक सहाय्य केले जाते. केंद्र व राज्य शासन यांच्याद्वारे पुरस्कृत असलेली ही योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी केंद्रीय राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना व राज्य शासनाच्या श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांचा समावेश होतो. या योजनांद्वारे वृद्ध नागरिकांना प्रति महिना 600 रुपये दिले जातात. मला आशा आहे कि तुम्हांला हि पोस्ट आवडली असेल आणि तुम्ही हि पोस्ट इतर लोकांसोबत शेअर कराल. धन्यवाद !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.