Ticker

6/recent/ticker-posts

जगातील Top 10 सर्च इंजिन कोणते आहेत? | Worlds Top 10 Search Engines in Marathi

Worlds Top 10 Search Engines in Marathi

तुम्हाला माहित आहेत का जगातील Top 10 सर्च इंजिन कोणते आहेत? Google आणि Yahoo! हे सर्च इंजिन सर्वांच्या परिचयाचे आहेतच. पण आपण गुगलचाच जास्त वापर करतो. परंतु आज इंटरनेटवर खुप सारे इंजिन आहेत. ज्यांची नावे आपल्याला माहित सुद्धा नसतील. ज्यांना गुगलचे स्थान मिळवायचे आहे. परंतु त्यातील अजुन कोणालाही गुगलचे स्थान मिळवता आलेलं नाही. या पोस्ट मधून आपण अशाच Top 10 Search Engine ची माहिती घेणार आहोत. ज्यांची स्पर्धा अजुनही Google Search Engine सोबत चालू आहे.

जगातील Top 10 सर्च इंजिनची सूची :

1. Google
2. Bing
3. Baidu
4. Yahoo!
5. Yandex
6. Ask
7. DuckDuckGo
8. Naver
9. AOL
10. Seznam

1) Google (गुगल)

GOOGLE चा full form :
Global Organization of Oriented Group Language of Earth

Google हे इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय असलेले Search Engine आहे . गुगल सर्च इंजिनवर दररोज करोडो अरबो प्रश्न विचारले जातात. आणि हे सर्च इंजिन त्या प्रश्नांची उत्तरे युजर्सपर्यंत पोहचवते. जगातील इंटरनेट वापरकत्यांपैकी जवळजवळ अंदाजे 80% वापरकर्ते Google search इंजिनचा वापर करतात.
Google चा शोध Stanford University, California च्या Sergey Brin आणि Larry Page या दोन Ph.D करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केला होता. त्यांनी विचार केला की, जर एखाद्या वेबसाईटची तुलना दुसऱ्या वेबसाईटशी करून रँकिंग केली तर युजर्सना चांगले Result सर्वात आधी मिळतील.
सुरुवातीला त्यांनी याचे नाव BackRub ठेवले होते. त्यानंतर 1998 मध्ये त्या नावामधे बदल करून Google या नावाने लाँच केले.

2) Bing (बिंग)

Bing हे देखील एक लोकप्रिय वेब सर्च इंजिन आहे. Bing सर्च इंजिनला 2009 साली Microsoft कंपनीद्वारे लाँच करण्यात आले होते. Bing वर आपल्याला Web व्यतिरिक्त News, Sport Score, Maps, Stock News, Mathematical Calculation, Local Information, इत्यादी सर्च करता येते.

3) Baidu (बायडू)

Baidu हे एक चीनी Search Engine आहे. जे गुगल प्रमाणेच 'वेब सर्च सेवा' पुरवते. या सर्च इंजिनला 2000 मध्ये Robin Lin याने सुरू केले होते. Baidu हे चीनचे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. हे सर्च इंजिन गुगल आणि बिंग सारख्याच सेवा पुरवते. उदाहरणार्थ, Baidu News, Baidu Maps, Baidu Image Search, Baidu Video Search, Baidu Anti Virus, Baidu Dictionary, इत्यादी.

4) Yahoo! (याहू)

Yahoo चा Full Form :
Yet Another Hierarchical Officious Borade

Yahoo ची सुरुवात 1994 ला Stanford University च्या दोन विद्यार्थी Jerry Yang आणि David Filo यांनी केली होती. आणि त्यांनी एका वर्षानंतर 1995 ला Yahoo या नावाने लाँच केले होते. Yahoo ला सुरुवातीला 'Jerry and Davids Guide to the World Wide Web' बोललं जात असे. परंतु काही काळानंतर Yahoo ची लोकप्रियता वाढल्याने त्याचे नाव बदलून Yahoo ठेवण्यात आले.

5) Yandex (यांडेक्स)

Yandex हे रशियामधील सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन आहे. खरं तर ही एक रशियन इंटरनेट कंपनी आहे. हे सर्च इंजिन 1997 मध्ये लाँच केले गेले होते. हे Yandex Maps, Yandex Music, Yandex Money, ऑनलाइन अनुवाद, आणि अशाअनेक सेवा प्रदान करते.  आपण या सर्च इंजिनमध्ये Images आणि Video देखील शोधू शकतो. या कंपनीद्वारे एक विनामूल्य ईमेल सेवा देखील प्रदान केली गेली आहे.

6) Ask (आस्क)

Ask.com ला अगोदर Ask Jeeves या नावाने ओळखले जायचे. याची स्थापना 1996 मध्ये गॅरेट ग्रएनर आणि डेविड वार्थेन द्वारे California च्या बर्कलेमध्ये केली होती. 2005 मधे Jeeves हा शब्द काढून टाकण्याची घोषणा करण्यात आली. आणि 2006 ला हा शब्द हटवण्यात आला व फक्त Ask.com हे नाव ठेवण्यात आले. खरं तर, हा एक प्रश्न आणि उत्तर समुदाय आहे. येथे आपण आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकतो.

7) DuckDuckGo (डकडकगो)

DuckDuckGo ची स्थापना गेब्रियल विनबर्ग ने 2008 ला केली होती. हे सर्च इंजिन गुगल इतके लोकप्रिय नाही आहे. तरीही पाश्चिमात्य देशांमध्ये करोडो लोकं DuckDuckGo चा वापर करतात. हे सर्च इंजिन तिकडे लोकप्रिय असण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्याची Privacy आहे. हे सर्च इंजिन युजरची कोणत्याही प्रकारची माहिती मॉनिटर करत नाही. याच कारणाने आता भारतातील लोकंही DuckDuckGo सर्च इंजिनचा वापर करू लागली आहेत.

8) Naver (नेवर)

Naver हे एक दक्षिण कोरियन (South Korean) ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. 1999 मधे दक्षिण कोरियाने आपले स्वतःचे सर्च इंजिन तयार केले. हे सर्च इंजिन विविध सेवा पुरवते. यामधे Junior Nave, Naver Webtoon, Naver Cafe, Naver Blog, Naver TV, Knowledge IN, Naver Encyclopedia, Naver Mail, इत्यादी सेवा आहेत.

9) AOL (एएलओ)

AOL एक अमेरिकन वेब पोर्टल आणि ऑनलाईन सर्व्हिस प्रोवायडर आहे. AOL या सर्च इंजिनचा वापर भारतामध्ये खुप कमी प्रमाणात केला जातो. परंतु हिंदी सर्च साठी हे एक चांगले सर्च इंजिन आहे. यामध्ये हिंदीच्या लाखो वेबसाईट आणि ब्लॉग उपलब्ध आहेत. हे सर्च इंजिन युजर्सना Web, Images, Shopping, Multimedia, News, इत्यादी सेवा पुरवते.

10) Seznam (सेझनाम)

Seznam हे सर्च इंजिन Czech गणराज्यामधील एक वेब सर्च पोर्टल आणि सर्च इंजिन आहे. या सर्च इंजिनची सुरुवात 1996 साली करण्यात आली होती. हे सर्च इंजिन गुगल प्रमाणेच अनेक सेवा पुरवते.


निष्कर्ष

मित्रांनो या लेखात जगातील Top 10 सर्च इंजिनची माहिती देण्यात आलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी ते Comment मधे जावून नक्की कळवा आणि ही माहिती तुमच्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा.

Post a Comment

0 Comments